Shreyas Iyer Viral Video : आयपीएल २०२५ च्या फायनलच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. संघाच्या सर्व चाहत्यांना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब यंदा ट्रॉफी उंचवणार असे वाटत होते पण संघ पराभूत झाला. या संपूर्ण स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता पुन्हा एकदा श्रेयस अय्यर चर्चेत आला आहे आणि त्याचे कारण पंजाब किंग्ज संघाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट केलेला व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर ट्रॅकवर वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाची शॉर्ट आणि लाल रंगाचे स्निकर घातल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर या व्हिडीओला ‘भाग भाग भाग शेर आया शेर’ असं कॅप्शन देखील देण्यात आले आहे.
सोबो मुंबई फाल्कन्स संघाकडून खेळण्यासाठी श्रेयस मैदानावर उतरला होता, त्यानंतर सध्या तो ब्रेकवर आहे. गेल्या महिन्यात त्याचे कझाकस्तान येथे फिरतानाचे फोटो समोर आले होते. हे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते.
???? ???? ???? ???? ???? ???? ???? ? pic.twitter.com/IeRcutHZ7S
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) July 21, 2025
सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पण या संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळाले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर श्रेयसला संघात मधल्या फळीचा फलंदाज म्हणून संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र त्याच्या चाहत्यांना निराश व्हावे लागले.
श्रेयस अय्यरने २०२१ मध्ये न्यूझीलंडविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १४ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याच्या ८११ धावा आहेत ज्यामध्ये १ शतक तर ५ अर्धशतक आहेत.
दरम्यान पंजाबच्या संघाने पोस्ट केलेल्या या स्प्रिंट व्हिडिओच्या माध्यमातून कसोटी संघातून बाहेर असूनही अय्यरच्या फिटनेसची काळजी घेत असल्याबद्दल पाहायला मिळत आहे. यापूर्वी आणखी एका व्हायरल क्लिपमध्ये, श्रेयस त्याच्या आईसोबत क्रिकेट खेळत असल्याचे दिसून आले होते, या व्हिडीओमध्ये आईची विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसला होता.