Shubman Gill Century: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा चमकला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात गिलने शतक झळकावलं आहे. बर्मिंघमच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. यादरम्यान गिलने १९९ चेंडूंचा सामना करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवं शतक झळकावलं आहे. तर कर्णधार म्हणून त्याने सलग दुसऱ्या कसोटीत दुसरं शतक झळकावलं आहे.

गेल्या सामन्यातील पहिल्या डावात गिलने दमदार शतकी खेळी केली होती. या सामन्यातील पहिल्या डावातही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या डावातही तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ज्यावेळी तो फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी यशस्वी जैस्वाल सेट झाला होता. त्यामुळे गिलने सुरूवातीला थोडा वेळ घेतला. त्याने जैस्वालसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. दरम्यान जैस्वाल बाद झाल्यानंतर त्याने धावांची गती वाढवली.

असा रेकॉर्ड करणारा ठरला चौथा भारतीय कर्णधार

इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने कर्णधार म्हणून सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार शतकं झळकावली आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये लागोपाठ शतकं झळकावणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने लागोपाठ ३ शतकं झळकावली होती.

तर विजय हजारे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या नावे देखील २ शतकं झळकावण्याची नोंद आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गावसकरांनी देखील २ शतकं झळकावली होती. आता गिलने देखील २ शतकं झळकावली आहेत. लागोपाठ ३ शतकं झळकावून त्याच्याकडे विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये लागोपाठ शतकं झळकावणारे भारतीय कर्णधार

विराट कोहली- ३ शतकं
विजय हजारे- २ शतकं
सुनील गावसकर – २ शतकं
शुबमन गिल- २ शतकं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.