India vs England 2nd Test: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर त्याने दुसऱ्या डावातील दोन्ही डावात शतकं झळकावली आहेत. या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे. यादरम्यान गिलने कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावसकरांचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
सुनील गावसकरांचा मोठा रेकॉर्ड मोडला
शुबमन गिलने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आधी ऋषभ पंत आणि त्यानंतर रवींद्र जडेजासोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान त्याने भारतीय संघासाठी एकाच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासह त्यांनी सुनील गावसकर यांचा एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी सुनील गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात एकाच सामन्यात ३४४ धावा केल्या होत्या. आता इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत ७५ धावांचा पल्ला गाठताच त्याने सुनील गावसकरांचा हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
एकाच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सुनील गावसकरांच्या नावावर होता. आता या यादीत शुबमन गिल अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध फलंदाजी करताना ३४४ धावा केल्या होत्या. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत चौथ्या स्थानी आहेत. सौरव गांगुली यांनी २००७ मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात ३३० धावांची खेळी केली होती.
भारतीय संघासाठी एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शुबमन गिल, इंग्लंड, २०२५- ३४९ धावा
सुनील गावसकर, वेस्टइंडिज, १९७१- ३४४ धावा
व्हीव्हीएस लक्ष्मण, ऑस्ट्रेलिया, २००१- ३४० धावा
सौरव गांगुली, पाकिस्तान, २००७- ३३० धावा
वीरेंद्र सेहवाग, दक्षिण आफ्रिका, २००८ – ३१९ धावा
भारतीय संघाची आघाडी ४५० पार
या सामन्यातही शुबमन गिल आणि ऋषभ पंतच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने ५५ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर गिल आणि जडेजाने महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाची आघाडी ४५० च्या पुढे गेली आहे.