Shubman Gill Furious on England Openers Video: भारतीय संघ लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ३८७ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडने देखील पहिल्या डावात ३८७ धावाच केल्या आहेत. यासह पहिल्या डावात दोन्ही संघांना बरोबरीत धावा केल्या. भारताचा संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या अवघी ६ मिनिटं आधी सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या दिवशी फलंदाजीला उतरावं लागलं. २ षटकं नक्कीच होऊ शकली असती, पण बुमराहचं एक षटकंच पूर्ण झालं, याशिवाय मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी ६-७ मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणं भाग होतं. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची जोडी फलंदाजीला उतरली. तर भारताकडून बुमराह गोलंदाजीसाठी आला. साहजिक जास्त षटकं होऊ नये म्हणून इंग्लंडचा संघ रडीचा डाव खेळणार याची अपेक्षा होती. पण यामुळे मैदानावर मोठा वाद झाला.

लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात मोठा ड्रामा!

भारताकडून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता आणि त्याला झटपट षटक पूर्ण करायचं होतं, जेणेकरून दुसरा गोलंदाज षटक टाकू शकेल. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी मात्र असं होऊ दिलंच नाही. पहिले २ चेंडू क्रॉलीने नीट खेळले. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेऊन क्रॉली पुन्हा स्ट्राईकवर आला. बुमराह गोलंदाजीसाठी तयार होता आणि त्याने त्याला रनअप घेण्यापासून दोन वेळा रोखलं. त्यानंतर जसप्रीत रनअप घेत पुढे आला आणि चेंडू टाकणार तितक्यात क्रॉलीने त्याला थांबवलं.

बुमराहला थांबवलेलं पाहताच गिल चांगलाच संतापला. स्लिपमधून जोरजोरात रागात त्याने दोन्ही फलंदाजांना सुनावलं. तर क्रॉलीदेखील त्याला प्रत्युत्तर देत होता. तितक्यात गिल संतापत त्यांना म्हणाला, चेंडू खेळा जरा-खेळून काढा. गिलचा हा संतापलेला व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रॉली दुसरं षटक होऊ नये म्हणून मुद्दाम वेळ काढत असल्याचं सर्वांनाच कळत होतं. गिलसह स्लिपमध्ये उभा असलेला संपूर्ण भारतीय संघ क्रॉलीला स्लेज करत होता. समालोचन करणारे समालोचक देखील यावरून इंग्लंड संघाला सुनावताना दिसले. पहिल्या षटकातील हा वाद इथेच नाही थांबला त्यानंतर षटक संपेपर्यंत हा वाद सुरूच होता. यादरम्यान इंग्लंडने बुमराहच्या पहिल्या षटकात २ धावा केल्या आणि दोन धावांची आघाडी घेत दोघेही नाबाद माघारी परतले.