शुबमन गिलने २०२३ या वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. तो ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे, ते पाहून अनेक माजी खेळाडू त्याला भावी सुपरस्टार म्हणत आहेत. गिलने १५ दिवसांपूर्वी द्विशतक झळकावले आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून त्याने सांगितले की तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. अहमदाबाद येथे झालेल्या निर्णायक सामन्यात गिलने ६३ चेंडूत १२६ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाज शुबमन गिलचे नाव होते. सामन्यादरम्यान शुबमन गिलने शतक झळकावून चाहत्यांची मने जिंकून किवी संघाला घाम फोडला. शुबमन गिलचे हे शतक पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या एका मुलीने असे काही केले जे पाहून सगळेच थक्क झाले.

शुबमन गिल गेल्या काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची यादी लांबत चालली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यातही स्टेडियममध्ये गिलच्या नावाचे पोस्टर हातात घेऊन उभ्या असलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जे पाहून गिललाही लाजल्यासारखे होईल.

पोस्टर मध्ये ते काय आहे

या मुलीने शुबमन गिल नावाच्या पोस्टरद्वारे टिंडरला खास आवाहन केले आहे. मुलीने लिहिले की, “शुबमनसोबत टिंडरवर जोडी आपली खास जमेल असे म्हणत तिने पोस्टरवर मेसेज लिहिला होता.” आता युजर्स या मुलीच्या फोटोवर खूप मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. शिवानी नावाच्या युजरने लिहिले, “दीदी का हमसफर कर दो कोई.” एका युजरच्या ट्विटला रिट्विट करताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही असे काही लिहिले आहे की वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रिट्विट करताना आकाश चोप्राने लिहिले, “प्रत्येक हृदयात गिल. यासोबतच त्याने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे.”

हेही वाचा: IND vs AUS Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफिची उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार

भारताने सामना जिंकला

टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका २-१ने जिंकली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने ४ विकेट्स गमावून २३४ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून किवी संघ खेळपट्टीवर उतरला तेव्हा त्यांचा डाव अवघ्या ६६ धावांवर आटोपला. हा न्यूझीलंड संघाचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill how awesome it is girl infatuated with shubman gill pleads with tinder for the prince of dreams avw
First published on: 02-02-2023 at 18:58 IST