Smriti Mandhana World Record with ODI Century: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० ने निर्भेळ मालिका विजय मिळवला आहे. सलग २ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली होती. पण भारतीय संघाला तिसरा सामना जिंकण्याची पूर्ण संधी होती, कारण अरूंधती रेड्डीचे ४ विकेट्स आणि त्यानंतर स्मृती मानधनाचे शतक या जोरावर भारताने चांगली सुरूवात केली होती. पण अखेरीस संघाला तिसऱ्या वनडेतही पराभव पत्करावा लागला. स्मृती मानधनाचे शतक जर संघाच्या कामी आले नसले तरी एक विश्वविक्रम मात्र आपल्या नावे केला आहे.

पर्थच्या WACA मैदानावर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला २९९ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे, ज्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनाने मोठी कामगिरी केली आहे. ॲनाबेल सदरलँडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. ॲनाबेल सदरलँडने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११० धावा केल्या.

Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
Many youths participated in the Wardha bodybuilding competition
शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.

हेही वाचा – SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय सलामी जोडीची सुरुवात खूपच खराब झाली. रिचा घोष १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर हरलीन देओलने स्मृती मानधनाला साथ देत दुसऱ्या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृती मानधना आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरली.

हेही वाचा – PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

स्मृती मंधानाने ३४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत एकदिवसीय कारकिर्दीतील तिचे ९वे शतक झळकावले. तिने १०३ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दुसरे शतक झळकावले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ वनडे शतक झळकावणारी मंधाना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूला ही मोठी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन भूमीवर एकापेक्षा जास्त एकदिवसीय शतक झळकावणारी मानधना ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – १३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज

इतकंच नव्हे तर स्मृती मानधनाचे या वर्षातील हे चौथे एकदिवसीय शतक असून तिने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात ४ शतकं झळकावणारी मानधना जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी महिला क्रिकेटपटू

४ – स्मृती मानधना (२०२४)
३ – बेलिंडा क्लार्क (१९९७)
३ – मेग लॅनिंग (२०१६)
३ – एमी सॅटरथवेट (२०१६)
३ – सोफी डिव्हाईन (२०१८)
३ – सिद्रा अमीन (२०२२)
३ – नेट सायव्हर ब्रंट (२०२३)
३ – लॉरा वोल्वार्ड (२०२४)

Story img Loader