तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. दोन धावांनी न्यूझीलंडच्या महिलांनी बाजी मारत मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने धडाकेबाज अर्धशतकी खेळीची नोंद केली. स्मृतीने 86 धावांची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात स्मृती झेलबाद होऊन माघारी परतली. मात्र यादरम्यान स्मृतीने टी-20 क्रिकेटमधल्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

याआधी 2018 साली स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात 83 धावा पटकावल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात स्मृतीने आपल्या जुन्या खेळीला मागे टाकत आणखी एक सर्वोत्तम खेळी उभारली आहे. या मालिकेनंतर भारतीय महिला संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – न्यूझीलंडचा भारतीय महिलांना व्हाईटवॉश, अखेरच्या टी-20 मध्येही भारत पराभूत