scorecardresearch

Premium

IND vs AUS, WTC 2023 Final: अनोख्या पद्धतीने DRS घेणाऱ्या रोहितची अ‍ॅक्शन शेअर करण्याचा मोह ICCलाही आवरेना, Video व्हायरल

India vs Australia, WTC 2023 Final: लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माची डीआरएस घेण्याची कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

IND vs AUS, WTC 2023 Final: Someone learn how to DRS from Rohit ICC appreciates Hitman's action Video goes viral
भारताचा कर्णधार रोहित शर्माची डीआरएस घेण्याची कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला बुधवारी (७ जून) इंग्लंड ओव्हलवर सुरुवात झाली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी आणि हवामान पाहून रोहितने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. या सामन्यात रविचंद्रन अश्विन खेळत नसल्याचे नाणेफेकीदरम्यान रोहितने सांगितले. त्याच्या या निर्णयाने लाखो क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले. मात्र, त्याचा हा निर्णयचं नाही त्याचबरोबर त्याची DRS घेण्याची अ‍ॅक्शन देखील व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील WTC फायनल २०२३ सामना किंग्स्टन ओव्हल, लंडन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अशी मजेशीर अ‍ॅक्शन केली की, ज्यावर आयसीसीलाही हसू अनावर झाले. आयसीसीने त्याचा हा व्हिडिओ शेअर करून रोहितच्या चाहत्यांना अधिक आनंदित केले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी वेगवगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

रोहित शर्माच्या ‘या’ कृतीचा आयसीसीने आनंद घेतला

खरंतर ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाची आहे. शार्दुल ठाकूरने १७व्या षटकातील चौथा चेंडू टाकला त्यावेळी स्ट्राईकवर फलंदाज लाबुशेन होता. चेंडू त्याच्या पॅडला लागला त्यानंतर भारतीय खेळाडूंकडून lbwसाठी जोरदार आवाहन करण्यात आले पण अंपायरनी नकार दिला. यानंतर शार्दुल ठाकूरने कर्णधार रोहित शर्माकडे डीआरएस घेण्याची मागणी केली. मात्र, येथे डीआरएस घेण्याची रोहितची पद्धत अशी होती की खुद्द आयसीसीलाही हसू आवरता आले नाही. साधारणपणे कर्णधार अंपायरसमोर डीआरएस घेतो आणि रिव्ह्यूसाठी संकेत देतो पण इथे रोहित गोलंदाजाकडे जातो. काही गोष्टी बोलतो आणि नंतर पाठीमागे हात घेऊन डीआरएससाठी आवाहन करतो.

हिटमॅनची डीआरएस घेण्याची शैली इतकी अनोखी होती की खुद्द आयसीसीलाही रोहित शर्माचा आनंद घेण्यापासून रोखता आले नाही. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने लिहिले की, “रिव्ह्यू कसा घ्यावा, रोहित शर्माकडून शिका.” हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.

हेही वाचा: Virat Kohli fact check: विराटने ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांसाठी दिली ३० कोटींची मदत; जाणून घ्या, काय आहे यामागील नेमकं सत्य?

भारताच्या हातातून सामना निसटत चालला आहे

विशेष म्हणजे, WTC फायनल २०२३ फायनल मॅचमध्ये चहापानानंतर कांगारू मजबूत स्थितीत आहेत, हे टीम इंडियासाठी चांगले लक्षण नाही. स्टीव्ह स्मिथ ट्रॅव्हिस हेड क्रिझवर उतरला असून तो भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत आहे. हेडने अर्धशतक झळकावले असून तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. उस्मान ख्वाजा खाते न उघडताच बाद झाला, तर वॉर्नरने ६० चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याचवेळी लाबुशेन २६ धावा करून शमीचा बळी ठरला. सध्या खेळ ६० षटकांचा आहे. ऑस्ट्रेलियाने ३०० धावांचा टप्पा पार केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 22:18 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×