Sophie Ecclestone Bowling Viral Video : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. यूपीची कर्णधार एलिस हिलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं यूपीला १२७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कारण यूपीच्या सोफी एक्लेस्टोनने फिरकीची जादू पुन्हा दाखवली आणि मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. सोफीने भेदक मारा करून मुंबईच्या हेली मॅथ्यूज, सिवर ब्रंट आणि अमनज्योत कौरला गुंडाळलं. त्यामुळे मुंबईचे टॉप ऑर्डरचे फलंदाज फलकावर मोठी धावसंख्या लावू शकले नाहीत. सोफीच्या जबरदस्त गोलंदाजीचा व्हिडीओ वुमन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सोफीच्या गोलंदाजीची क्रिडाविश्वात चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, यूपीची खराब सुरुवात झाल्यानंतरही ताहिला मेक्ग्राने चौफेर फटकेबाजी केली. ताहिलाने २५ चेंडूत ३८ धावा कुटल्या. पण अमेलिया केरच्या गोलंदाजीवर ताहिला बाद झाल्याने यूपीला मोठा धक्का बसला. मात्र, कठीण परिस्थितीत ग्रेस हॅरिसने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. पण केरच्या गोलंदाजीवर हॅरिसचा झंझावात थांबला. मात्र, यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात यूपीला ५ धावांची गरज असताना षटकार ठोकला. सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सला विजयी सलामी दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या लीगमध्ये पहिला पराभव झाला.

नक्की वाचा – हवेत उडी मारून हरमनप्रीतने एका हातात घेतला झेल; देविकाला पाठवलं माघारी, Video पाहून आश्चर्यच वाटेल

इथे पाहा व्हिडीओ

सोफीने १७ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी केली. दिप्ती शर्माने १४ चेंडूत १३ धावा केल्या.मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज हिली मॅथ्यूजने ३० चेंडूत ३५ धावा कुटल्या. मुंबईच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईच्या फलंदाजांना फलकावर मोठी धावसंख्या लावता आला नाही. वेगवान गोलंदाज अंजलीने यास्तिका भाटियाला बाद करून एक विकेट घेतला. तर राजेश्वरी गायकवाडने अमेलिया केर आणि हुमैरा काझीला बाद करून दोन विकेट्स मिळवल्या. सोफीने ३ तर दिप्ली शर्माला २ विकेट मिळाली. यूपीची वेगवान गोलंदाज अंजली सरवानीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मुंबईची सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटियाची दांडी गुल केली. यास्तिका १५ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sophie ecclestone takes 3 wickets of mumbai indians women watch sophie ecclestone outstanding bowling viral video on wpl twitter nss
First published on: 18-03-2023 at 21:33 IST