2018 सालामध्ये फॉर्म गमावून बसलेल्या धोनीवर विश्वचषकाआधीच संघातून निवृत्त होण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे मालिकेमध्ये धोनीने दमदार पुनरागमन केलं. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही धोनीने चांगल्या धावा केल्या. यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, विश्वचषकानंतरही धोनी भारतीय संघात खेळू शकतो असं मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !

“विश्वचषकानंतरही धोनी भारतीय संघात खेळू शकतो. जर भारत विश्वचषक जिंकला आणि धोनीने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याने निवृत्ती का स्विकारावी? जर तुमच्याकडे चांगली प्रतिभा असेल तर वय हा मुद्दा गौण ठरतो.” सौरव कोलकात्यात पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. यावेळी सध्याच्या भारतीय संघाचं सौरव गांगुलीने कौतुक केलं.

विश्वचषकात भारतीय गोलंदाज संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलतील असंही गांगुली म्हणाला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे गोलंदाज सध्या चांगलेच फॉर्मात आहेत. त्यामुळे या गोलंदाजांचं चांगलं खेळणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. विश्वचषकासाठी अतिरीक्त गोलंदाज म्हणून गांगुलीने उमेश यादवच्या नावाला पसंती दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly backs ms dhoni to continue after 2019 world cup says age never a factor before talent
First published on: 07-03-2019 at 19:27 IST