BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौरव गांगुली बुधवारपासून होम क्वारंटाइन झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सौरव गांगुलीने स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्नेहाशिष हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी काही काळ बंगालच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. करोनाची लागण झाल्याचे समजताच स्नेहाशिष यांना बेले व्यू या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले काही दिवस स्नेषाशिष यांना ताप येत होता आणि तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल बुधवारी संध्याकाळी उशिरा आला. त्यामुळे आरोग्यविषयक मार्गदर्शक नियमांनुसार सौरव गांगुलीलाही ठराविक कालावधीसाठी घरात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

स्नेहाशिष मोमीनपुर येथे वास्तव्यास होते. पण त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी यांना करोनाची लागण झाल्याने ते सौरव गांगुली रहात असलेल्या बेहाला येथील घरात स्थलांतरित झाले होते. पण त्यांना सातत्याने ताप येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly in home quarantine after elder brother tests positive for covid 19 vjb
First published on: 16-07-2020 at 10:39 IST