दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिसने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॉरिसने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. टायटन्स संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्याने सांगितले. मॉरिसने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्वांचे आभार, मग तो मोठा असो किंवा छोटा. ही एक मजेदार राइड होती!”

आयपीएल आणि मॉरिस

मॉरिस हा आयपीएल २०२१ चा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला राजस्थान रॉयल्सने १६.२५कोटी रुपयांची मोठी बोली लावून घेतले. मात्र तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याची कामगिरी चांगली होती, पण यूएईमध्ये मॉरिस दुसऱ्या टप्प्यात सपशेल अपयशी ठरला. त्याने चेन्नई सुपर किंग्जमधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेन्नईमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचाही भाग होता.

हेही वाचा – IND vs SA 3rd Test Day 1 : विराटनं जिंकला टॉस; सिराज सामन्याबाहेर, ‘या’ गोलंदाजाला मिळाली संधी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ख्रिस मॉरीसने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ४२ वनडे आणि २३ सामने खेळले. त्यामध्ये त्याने अनुक्रमे १२, ४८ आणि ३४ विकेट्स घेतल्या. मॉरिसने २०२१च्या अखेरीस निवृत्तीचे संकेत दिले होते. मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात त्याची निवड झाली नव्हती.