भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या दिवसअखेर आफ्रिका संघाने ८ षटकात १ बाद १७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला लवकर तंबूत धाडण्यात भारताला यश आले. तत्पूर्वी विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट माऱ्यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. विराटने ७९ धावा करत संघाला आधार दिला. दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत त्यांना प्रथमच येथे कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (३) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद राहिले.

भारताचा पहिला डाव

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकात ४ बाद १४१ धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. १६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

विराट दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिला सामना ११३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव झाला.

हेही वाचा – VIDEO : क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर रॉस टेलरनं घेतली विकेट, प्रेक्षकांच्या जल्लोषामुळं स्टेडियमही दुमदुमलं!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव</p>

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.