५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. केप टाऊन येथे पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व फाफ डुप्लेसीसकडे सोपवण्यात आलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिम्बाब्वेविरुद्ध ऐतिहासीक ४ दिवसीय कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त डुप्लेसीसच्या जागी डिव्हीलियर्सने संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र भारताविरुद्ध मालिकेसाठी डुप्लेसीस आता पूर्णपणे तयार झाला असल्याचं कळतंय. याव्यतिरीक्त जलदगती गोलंदाज डेल स्टेनचं संघात पुनरागमन आणि स्फोटक फलंदाज क्विंटन डी कॉकला संघात मिळालेली जागा ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ आफ्रिकेचा कसा सामना करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

पहिल्या कसोटीसाठी असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ –

फाफ डु प्लेसीस (कर्णधार), हाशिम आमला, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), थिएनस डी ब्रुन, एबी डिव्हीलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडीन मार्क्रम, मॉर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरिस, अँडील फेलीक्वेयो, वर्नान फिलँडर, कगिसो रबाडा, डेल स्टेन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa announced team for the first state against india dale styne faf du plesis and de cock gets place in team
First published on: 29-12-2017 at 17:05 IST