आशियाई क्रीडा स्पध्रेचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी होणार असून, या कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोरियाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ रेखाटला जाणार आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेच्या गीतामध्ये ४५ देशांचे दहा हजारहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ‘४.५ अब्ज नागरिकांचे स्वप्न, एक आशिया’ असे या गीताचे सूत्र आहे.
दक्षिण कोरियामधील चित्रपट दिग्दर्शक क्वॉन-तैक आणि जांग जिन यांनी सांगितले की, ‘‘कोरियाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारणार आहोत.’’
सीआँग-जू आणि युन सू-यिआँग उद्घाटन आणि ४ ऑक्टोबरला होणाऱ्या समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘गंगम’ नृत्यावर ठेका धरायला लावणारा साय आणि पियानोवादक लँग लँग यांचीसुद्धा अदकारी यावेळी सादर करण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला सुमारे ६२ हजार क्रीडारसिक हजेरी लावणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
उद्घाटन सोहळ्यात डिजिटल तंत्रज्ञानानिशी कोरियन दर्शन
आशियाई क्रीडा स्पध्रेचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी होणार असून, या कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोरियाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ रेखाटला जाणार आहे.
First published on: 19-09-2014 at 05:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korea get ready asian games opening ceremony