फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात स्पेनला चिलीकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा सट्टेबाजारात चांगलाच परिणाम दिसून आला आहे. दुसरीकडे नेदरलँड्सची यशस्वी घोडदौड सुरू आहे. रॉबीन व्हॅन पर्सी तसेच आर्येन रॉबेनच्या खेळामुळे त्यांचा सट्टेबाजारातील भाव चांगलाच वधारला आहे. जर्मनीच्या थॉमस म्युलरपाठोपाठ व्हॅन पर्सी आजही आघाडी टिकवून आहे. नेयमार वा मेस्सी हे जरी आपले भाव टिकवून असले तरी आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात त्यांची क्रमवारी घसरली आहे. ब्राझील, अर्जेटिना की जर्मनी ही विश्वचषकासाठी असलेली चढाओढ कायम असली तरी स्पेनचा भाव आता घसरला आहे. अर्जेंटिना यंदाचा चषक पटकावणार अशी खात्री आता सट्टेबाजांनाही वाटू लागली आहे. मात्र अद्यापही सट्टेबाजारात ब्राझीलचा भाव वधारलेला आहे. मात्र तो टिकूनच राहील याची सट्टेबाजांना खात्री नाही. नेहमी धोका पत्करण्यात तयार असलेल्या काही पंटर्सनी नेदरलँड्सच्या बाजूनेही कौल दिला आहे. भारतीय सट्टेबाजारात सावध खेळीच पाहायला मिळत आहे. आश्चर्य म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आजही लोकप्रिय आहे. त्याचा भाव वधारलेलाच आहे. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यासाठी आजही पंटर्सची रोनाल्डोसाठी पसंती आहे.
आजचा भाव :
*कोस्टा रिका     इटली
२ रुपये २५ पैसे (१३/२)    ६५ पैसे (४/७)
*स्वित्र्झलड      फ्रान्स
३ रुपये २५ पैसे (४/१)    ९० पैसे (१३/१५)
७० पैसे (८/११)    २ रुपये ५० पैसे (९/२)
निषाद अंधेरीवाला