महेला जयवर्धने आणि लहिरू थिरिमाने यांच्या अर्धशतकांनंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिमुथ करुणारत्ने ५ धावा काढून बाद झाला. यानंतर दिलशान आणि जयवर्धने यांनी भागीदारी करत डाव सावरला. मात्र जॅक्सन बर्डने दिलशानला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर आलेल्या थिरिमानेने जयवर्धनेला चांगली साथ दिली. २००९ नंतर जयवर्धनेने पहिल्यांदाच परदेशात अर्धशतकाची नोंद केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जयवर्धनेला मिचेल स्टार्कने बाद केले. त्याने १२ चौकार आणि एका षटकारासह ७२ धावा केल्या. जॅक्सन बर्डने ४, मिचेल स्टार्कने ३, तर पीटर सिडलने २ बळी घेतले.