इंग्लंड आणि श्रीलंका संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३९ वा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार श्रीलंका संघाने पाथुम निसांकाच्या अर्धशतकाच्या जोरावर, इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य दिले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने आक्रमक सुरुवात केली. परंतु चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. ख्रिस वोक्सने कुसल मेंडिसला (१८) लियाम लिव्हिंगस्टोनकडे झेलबाद केले. त्यामुळे श्रीलंकेने चार षटकांत एक गडी बाद ३९ धावा केल्या.

त्यानंतर पाथुम निसांकाने संघाचा डाव सावरताना शानदार खेळी साकरली. त्याने ४५ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकार लगावत ६५ धावा केल्या. त्याची ही खेळी श्रीलंका संघाकडून खेळली गेलेली सर्वोच्च खेळी होती. त्याचबरोबर भानुका राजपक्साने २२ धावांचे योगदाने दिले. त्यामुळे श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : बेन स्टोक्सने धक्का दिल्याने कोसळला ‘हा’ वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना, मार्क वुडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २६ धावा दिल्या. तसेच बेन स्टोक्स, अदिल रशीद, सॅम करन आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी १ विकेट घेतली. दरम्यान इंग्लंड संघाला १४२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला कर्णधार जोस बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान आणि लियाम लििव्हगस्टोन यांच्याकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.