क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली आहे. २२ यार्डच्या खेळपट्टीवर अनेक सामने संस्मरणीय ठरले आहेत, परंतु जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा तुफानी गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील स्पर्धा वेगळी होती. हे दोघे जेव्हा आमनेसामने असायचे तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्व डोळे झाकून बसायचे. अख्तरने आता सचिनसोबतच्या अशाच शत्रुत्वाचा एक किस्सा शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्रकरण १९९८ मध्ये कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडीयमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याशी संबंधित आहे. या सामन्यात अख्तरने पहिल्याच चेंडूवर सचिनला बोल्ड केले. अख्तरने अलीकडेच टेलिग्राफच्या पॉडकास्टदरम्यान याचा उल्लेख केला. त्याचा व्हिडिओ इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ट्विट केला आहे. या पॉडकास्टमध्ये अख्तरने वॉनशीही संवाद साधला आहे.

माझ्यामुळे स्टेडियम रिकामे झाले- अख्तर

मास्टर-ब्लास्टर सचिनला त्याने गोलंदाजी केली आणि त्यामुळेच कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम रिकामे करावे लागल्याचे अख्तरने म्हटले आहे. अख्तर म्हणाला, “सचिन एक अद्भुत व्यक्ती आहे. या पृथ्वीवरील सर्वात महान मनुष्य आणि फलंदाज. मी त्याच्याकडे बघितले आणि म्हणालो भाऊ तुला माझ्यासमोर संधी नाही. कोलकात्यात मी त्याला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. क्रिकेटच्या इतिहासात तो पहिल्याच चेंडूवर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ होती, माझ्यामुळे तो धावबाद झाला, माझ्यामुळे ७०-८० हजार लोकांना कोलकाता स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा:   IND vs BAN: दुर्मिळ नो-बॉल टाकणारा बांगलादेशचा गोलंदाज… टीम इंडियासाठी सलग दोन फ्री हिट्स!

पुढे बोलताना अख्तर म्हणाला, “पहिल्यांदा माझ्यामुळे कसोटी सामना दोन तास उशिरा सुरू झाला. जगाच्या इतिहासात प्रथमच. प्रथम हजारो लोकांमध्ये खेळला जात होता पण नंतर अचानक स्टेडियममध्ये कोणीच नव्हते.

असा झाला होता कसोटी सामना

या सामन्यात पाकिस्तानने भारताचा ४६ धावांनी पराभव केला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला सचिन दुसऱ्या डावात नऊ धावा करून धावबाद झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १८५ धावांवर गारद झाला. भारताने दुसऱ्या डावात २२३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने पुन्हा ३१६ धावा केल्या. त्यासाठी एकट्या सईद अन्वरने १८८ धावांची इनिंग खेळली होती. मोहम्मद युसूफने ५६ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stadium was evacuated akhtar bragged about dismissing sachin for golden duck video goes viral avw
First published on: 08-12-2022 at 15:16 IST