शैलेश गराळे आणि राजेंद्र देशमुखच्या चढायांना पंकज म्हात्रे आणि सुशील भाोसले यांनी दिलेल्या साथीच्या बळावर बँक ऑफ इंडियाने पांचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्यावसायिक स्पध्रेत रविवारी पुणे पोलिसांचा २२-१० असा पराभव केला.
पुणे पोलिसांकडून स्वप्नील शेलारने पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. याचप्रमाणे रिझव्र्ह बँकेने बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दोन विजयांची नोंद केली. सकाळच्या सत्रात रिझव्र्ह बँकेने कासीम शेख आणि देवेंद्र परब यांच्या शानदार चढायांच्या बळावर जे. जे. हॉस्पिटलवर १९-१७ अशी मात केली, इंडियन गार्मेट्सचा १९-९ असा पराभव केला.
महिला विभाागात पुण्याच्या सुवर्णयुग संघाने ओम कबड्डी संघाचा ६७-१६ असा धुव्वा उडवला. सुवर्णयुगकडून ईश्वरी कोंडाळकर आणि दीक्षा जोशी यांनी दमदार चढाया केल्या, तर रेणुका तापकीर आणि मयुर शिरसाट यांनी लाजवाब पकडी केल्या. तसेच पुण्याच्या शिवाई संघाने एमडी स्पोर्ट्स क्लबचा २७-२५ अशा फरकाने पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक, सुवर्णयुगची आगेकूच
शैलेश गराळे आणि राजेंद्र देशमुखच्या चढायांना पंकज म्हात्रे आणि सुशील भाोसले यांनी दिलेल्या साथीच्या बळावर बँक ऑफ इंडियाने पांचगणी व्यायाम
First published on: 20-01-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State kabaddi competition