India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : बॉर्डर गावसकर ट्रॉफीत २-१ ने आघाडी घेत टीम इंडियाने मालिका खिशात घातल्यानंतर आता ऑस्ट्रे्लियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेचा थरार सुरु झाला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. सलामीला आलेल्या ट्रॅविस हेडची अवघ्या ५ धावांवर दांडी गुल केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण स्मिथलाही भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने २२ धावांवर असताना बाद केलं. विशेष म्हणजे स्मिथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे फॉरमॅटमध्ये आजच्या सामन्यात नवीन विक्रम करण्याची संधी होती. पण स्मिथ २२ धावांवर बाद झाल्याने त्याला नवा विक्रम करता आला नाही. हार्दिकच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडूची एज लागली आणि विकेटकिपर के एल राहुलने स्मिथचा जबरदस्त झेल घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टीव्ह स्मिथला हा विक्रम करण्याची संधी हुकली

स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 139 एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५.११ च्या सरासरीनं ४९१७ धावा केल्या आहेत. त्यामुळे या फॉरमॅटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी स्मिथला ८३ धावांची आवश्यकता होती. आजच्या सामन्यात स्मिथला ८३ धावांची खेळी करण्याची गरज होती, कारण या धावांच्या जोरावर स्मिथने एकदिवसीय सामन्यांत ५ हजार धावा पूर्ण केल्या असत्या. त्यानंतर तो ५ हजार धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या लिस्टमध्ये १७ व्या क्रमांकावर पोहोचला असता. पण स्टीव्ह स्मिथ हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर २२ धावांवर बाद झाल्याने नवीन विक्रम करण्याची स्मिथची संधी हुकली.

नक्की वाचा – IND vs AUS 1st ODI : वानखेडे मैदानात पहिल्या वनडेचा थरार; क्रिकेट इतिहासात या ३ विक्रमांची होणार नोंद?

इथे पाहा व्हिडीओ

मिचेल मार्शची आक्रमक अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ट्रेविस हेड स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिचेल मार्शने दबावात न खेळता आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला हार्दिक पांड्याने २२ धावांवर तंबूत पाठवलं. ऑस्ट्रेलियाच्या २ विकेट्स गेल्यानंतरही मिचेल मार्शने चौफेर फटकेबाजी करणं सुरुच ठेवलं. मार्शने ६५ चेंडूत ८१ धावा कुटल्या. १० चौकार आणि ५ षटकार ठोवून मार्शने वानेखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मार्शला रविंद्र जडेजाच्या गुगलीने ८१ धावांवर बाद केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steve smith could not make odi new record as hardik pandya takes the wicket watch steve smith catch viral video nss
First published on: 17-03-2023 at 15:44 IST