कर्णधार स्टीव्ह वॉ, यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलक्रिस्ट, फिरकीपटू शेन वॉर्न, सलामीवीर मार्क वॉ, मॅच फिनिशर मायकल बेवन, वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांसारखे सारे खेळाडू एकाच वेळी एकाच संघात असणे या कोणत्याही संघासाठी सुवर्णकाळापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियन संघाने तो काळ अनुभवला. या आणि त्यांच्यानंतर आलेल्या काही प्रतिभावान खेळाडूंच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९९९, २००३ आणि २००७ असे सलग तीन विश्वचषक जिंकले. पण इतके प्रतिभावान खेळाडू एकत्र संघात असले की आपसात स्पर्धा आणि हेवेदावे असणारच. तसेच काहीसे हेवेदावे त्यावेळच्या ऑस्ट्रेलियन संघात होते. त्यावेळी याबाबत कोणी फारसे बोलले नाही. मात्र आता शेन वॉर्नने आपल्या मनातील खदखद एका ट्विटवर रिप्लाय देताना व्यक्त केली.

विराटचा एक रिप्लाय अन् वादच संपला…

वॉर्नने आपल्या आत्मचरित्रात स्टीव्ह वॉ स्वार्थी खेळाडू असल्याचे म्हटले आहे. तसेच तो स्वत:च्या धावांकडेच लक्ष द्यायचा असेही वॉर्नने नमूद केले आहे. या दरम्यान रॉब मूडी (robelinda2) नावाच्या ट्विटर अकाऊंटवर क्रिकेट चाहत्याने एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये चाहत्याने स्टीव्ह वॉ याने किती वेळा दुसऱ्या फलंदाजांना धावचीत केले किंवा तो किती रन आऊटमध्ये सहभागी होता, याबद्दलची आकडेवारी दिली. तसेच त्याने याचा एक व्हिडीओ बनवून पोस्टदेखील केला. त्या चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले की स्टीव्ह वॉ त्याच्या आंतरराष्टर्रीय कारकिर्दीत एकूण १०४ रन आऊटमध्ये सहभागी होता. त्यापैकी ७३ वेळा त्याचा सहकारी फलंदाज धावचीत झाला. ते कमनशिबी फलंदाज या व्हिडीओमध्ये बघा. यासोबत त्या चाहत्याने व्हिडीओदेखील शेअर केला.

CSK च्या संघाकडून खेळशील का? एबी डीव्हिलियर्स म्हणतो…

चाहत्याच्या त्या व्हिडीओवर शेन वॉर्नने रिप्लाय देत स्टीव्ह वॉ बद्दल आपले मत व्यक्त केले. “तुमच्यासाठी मी पुन्हा हजार वेळा सांगेन – मला स्टीव्ह वॉ वर अजिबात राग नाही. मी माझ्या सर्वकालीन सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन संघातही त्याला स्थान दिले होते. पण मी आतापर्यंत ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो, त्यांच्यापैकी स्टीव्ह वॉ हा सर्वात जास्त स्वार्थी खेळाडू होता. तुम्हीच ही आकडेवारी पाहा”, असा रिप्लाय त्या चाहत्याच्या व्हिडीओवर वॉर्नने दिला.