आपल्या पीळदार आणि आखीव, रेखीव शरीरसंपदेच्या जोरावर सुहास खामकरने सातव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ या किताबाला गवसणी घातली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत मुबंईच्या सुहासला मुंबईच्याच आशीष साखरकर आणि पिंपरी-चिंचवडच्या महेंद्र पगडे यांची कडवी स्पर्धा होती. पण या तिघांच्या तुलनेच्या वेळी सुहासने आपल्या कोरीव शरीरसौष्ठवाचे प्रभावीपणे प्रदर्शन करत बाजी मारली. सुहासला यावेळी १ लाख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी सर्वोत्तम पोझरचा पुरस्कार पुण्याच्या अजित थोपटेने, प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचा पुरस्कार जळगावच्या सचिन पाटीलने मिळवला. या स्पर्धेतील ‘मिस-महाराष्ट्र’ हा पुरस्कार नाशिकच्या स्टेफी मंडलने पटकावला.
महाराष्ट्र श्री स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
५५ किलो- १) सुनील सकपाळ (मुंबई) (२) रोशन तटकरे (प.ठाणे) (३) भरत जाधव (पुणे).
६० किलो- १) जय सिंग (अहमदनगर) (२) रामा मायनाक (सातारा) (३) अमर फरांदे (सातारा).
६५ किलो- १) अजित थोपटे (पुणे) (२) विजय जाधव (ठाणे) (३) फैयाज शेख (सातारा).
७० किलो- १) विजय मोरे (कोल्हापूर) (२) इम्रान मेवेकरी (पुणे) (३) गणेश गोसालीया (औरंगाबाद).
७५ किलो- सचिन पाटील (जळगाव) (२) सचिन पाटील (ठाणे) (३) जय दाभाडे (पिंपरी चिंचवड).
८० किलो- १) आशिष साखरकर (मुंबई) (२) प्रणय लोंढे (पिंपरी चिंचवड) (३) दुर्गाप्रसाद दासरी (कोल्हापूर).
८५ किलो- १) सुहास खामकर (मुंबई) (२) महेश राव (ठाणे) (३) गोपाळ थापा (पिंपरी चिंचवड).
८५ किलोवरील- १) महेंद्र पगडे (पिंपरी चिंचवड) (२) प्रशांत साळुंखे (मुंबई) (३) अविनाश इंगळे (पुणे).
उत्कृष्ट पोजर- अजित थोपटे (पुणे).
प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू- सचिन पाटील (जळगाव).
मिस महाराष्ट्र (खुला गट) महिलांच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
१) स्टेफी मंडल (नाशिक) (२) विद्या सिरस (पुणे) (३) आशा थापा (नाशिक) (४) पुनम सुतार (कोल्हापूर) (५) सिद्धी शिंदे (कोल्हापूर).
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
सुहास सातवे आसमाँ पर..
आपल्या पीळदार आणि आखीव, रेखीव शरीरसंपदेच्या जोरावर सुहास खामकरने सातव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ या किताबाला गवसणी घातली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली होती.

First published on: 23-04-2013 at 03:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas khamkar seventh time maharashtra shree