Sunil Gavaskar Picks India Playing 11 For Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ चा संघ जाहीर झाल्यानंतर अनेक विविध प्रतिक्रिया येत आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली गेली, ज्यात शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. आशिया चषक २०२५ ला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी आशिया चषकासाठी प्लेईंग इलेव्हन निवडली.

आशिया चषक २०२५ संघात सलामीवीर म्हणून तीन जणांना संधी मिळाली आहे. शिवाय संघात दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत. तर ३ अष्टपैलू खेळाडूंना संघात संधी दिली गेली आहे. गोलंदाजीत ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटू आहेत. यावरूनच सुनील गावस्करांनी प्लेईंग इलेव्हन निवडली आहे.

सुनील गावस्करांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही जोडी सलामीची भूमिका सांभाळेल. कारण दोघेही डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज आहेत. दोघांनी गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिल्यास मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लागेल. गावस्कर म्हणाले की, शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करतील. दोघेही डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज असल्याने सलामीला उतरती. संजू फलंदाजीत खालच्या क्रमांकावर खेळेल.

निवडकर्त्यांनी जितेश शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. संजू सॅमसन सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करत आला आहे, तर यष्टीरक्षण विभागात तो अचूक आहे. तर जितेश शर्मा हा देखील एक उत्कृष्ट यष्टीरक्षक असून तो फिनिशरची भूमिकाही सांभाळतो. आयपीएल २०२५ मध्ये याची त्याने झलक दाखवली आहे. पण गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसनची निवड केली. गावस्कर म्हणाले की, सॅमसनची फलंदाजीची स्थिती सामन्यानुसार बदलत राहील, याचा फायदा संघालाच होईल.

आशिया चषक २०२५ साठी सुनील गावस्करांची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

भारताचा आशिया चषक २०२५ साठी संपूर्ण संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग