भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म, हा सध्या भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित मुद्दा ठरला आहे. गेल्या काही काळापासून विराट कोहली क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. कधी काळी धावांचा पाऊस पाडणारा विराट सध्या एक-एक धाव जमवण्यासाठी झगडताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर काही माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. असे असले तरी, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा पराभव केल्यानंतर एका क्रीडा वाहिनीशी संवाद साधताना सुनील गावसकर विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत बोलले. ते म्हणाले, “विराटचे काय चुकत आहे, हे सांगण्यासाठी फक्त २० मिनिटे त्याच्यासोबत घालवण्याची गरज आहे. मला जर त्याच्यासोबत २० मिनिटे थांबण्याची संधी मिळाली तर मी त्याला नक्कीच मदत करू शकतो.”

हेही वाचा – Video : एनसीएमध्ये रंगली केएल राहुल अन् झुलन गोस्वामीची जुगलबंदी; राहुलने केला घातक गोलंदाजीचा सामना

अलीकडेच विराटच्या अडचणींचे वर्णन करताना गावसकर म्हणाले होते की, ‘ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू हाताळणे ही त्याची महत्त्वाची समस्या आहे. त्यात भर म्हणजे, फॉर्ममध्ये परत येण्याच्या चिंतेने त्याच्याकडून होणाऱ्या चुकांमध्ये आणखी वाढ होत आहे.’

हेही वाचा – Rishabh Pant : युवराज सिंगच्या ‘त्या’ ट्वीटला ऋषभ पंतने मोजक्या शब्दांत दिले उत्तर, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी (१७ जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती झालेल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली अवघ्या १७ धावा करून बाद झाला. रीस टॉपलीने जोस बटलरकरवी त्याला बाद केले होते. विराट ज्या चेंडूवरती बाद झाला तो चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा होता. गेल्या काही डावांमध्ये तो अनेकदा अशाच प्रकारे बाद झाला आहे. सुनील गावसकर यांनी विराटची नेमकी हीच समस्या हेरली आहे.