Sunil Gavaskar’s reaction to Virat-Rohit : माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याचे समर्थन केले आहे. गावसकरांच्या मते, हे दोन्ही ज्येष्ठ खेळाडू केवळ भारतीय संघातील महत्त्वाचे फलंदाज नाहीत, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहेत. टी-२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर रोहित आणि कोहली या दोघांनीही भारतासाठी हा फॉर्मेट खेळलेला नाही, पण दोघेही खेळाच्या या लहान फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहेत.

सुनील गावसकर म्हणाले, “मला त्यांचे क्षेत्ररक्षण आवडते. विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांची मैदानावर खूप मदत होईल. याशिवाय ड्रेसिंग रुममध्ये सिनियर असल्याने ते मैदानावरही योगदान देतील. कधीकधी तुम्ही वयाच्या ३५-३६व्या वर्षी असता तेव्हा तुमच्या कृती मंद होतात. तुमचा थ्रो सुद्धा तितका वेगवान होत नाही. त्यामुळे मैदानात क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना कुठे उभा करायचे यावर चर्चा होत. पण या दोन्ही खेळाडूंमध्ये अशी कोणतीही अडचण नाही. कारण हे दोघेही अजूनही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत.”

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्समध्ये रोहितच्या जागी कर्णधारपदही देण्यात आले आहे. रोहितचा संघात समावेश झाल्यास तो छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल का, हे अद्याप कळलेले नाही. पण रोहितचा अनुभव पाहता संघाचे नेतृत्व करत नसला, तरी तो खूप काही देऊ शकतो, असा विश्वास गावसकर यांना वाटतो.

हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा ‘हुक्का’ ओढतानाचा VIDEO व्हायरल, माहीच्या या कृतीने चाहते झाले आश्चर्यचकित

सुनील गावसकर म्हणाले, “रोहित कर्णधार असेल की नाही हे आम्हाला माहीत नाही, कर्णधार कोणीही असो, पण काहीही झाले तरी संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल. कोहली गेल्या दीड वर्षांपासून अशाच जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. २०२३ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी अविश्वसनीय होती. ज्यात त्याने तीन शतकांसह ७५० धावा केल्या. त्यामुळे त्याच्या मर्यादित षटकांच्या फलंदाजीबद्दल शंका नाही.”

हेही वाचा – David Warner : ‘…म्हणून माझी आई डेव्हिडला ‘शैतान’ म्हणते’, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा

अमेरिकन खेळपट्ट्यांवरचा अनुभव उपयोगी पडेल : इरफान

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणलाही वाटते की रोहित आणि कोहली यांनी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असावा. कारण अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या काही खेळपट्ट्यांशी प्रत्येकजण अपरिचित आहे. त्यामुळे या दोघांचा अनुभव मैदानात आणि मैदानाबाहेरही आवश्यक असेल. १ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात टी-२० विश्वचषक संयुक्तपणे खेळवला जाणार आहे.