आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी ३० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. सन टीव्ही हे हैदराबाद संघाचे मालक असून त्यांनी केलेली मदत सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आत्तापर्यंत देणग्यांमधील ही सर्वात मोठी देणगी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत सरकार आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या विविध कार्यक्रमांना देणगी द्या आणि ऑक्सिजन सिलिंडर, औषधे इत्यादी पुरविणार्‍या स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी करा. याशिवाय आम्ही विविध पैलूंवर खर्च करू. आर्थिक देणग्या व्यतिरिक्त, सन टीव्ही नेटवर्क आपल्या सर्व मीडिया मालमत्तांसह आपल्या संसाधनांचा लाभ घेईल, ज्यामुळे संपूर्ण जगातील आणि जगातील कोट्यवधी टीव्ही दर्शकांमध्ये अधिक जागरूकता पसरविण्यास मदत होईल, असे सनरायझर्स हैदराबादने एका निवेदनात सांगितले.

 

करोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला. सनरायझर्स हैदराबाद संघातील यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला करोना झाला. त्यानंतर लीग तहकूब झाली. यंदाच्या हंगामात हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नाही. गुणतालिकेत ते ७ पैकी ६ पराभवांसह शेवटच्या स्थानी होते.

यंदाच्या आयपीएल हंगामात एकूण 29 सामने खेळले गेले. आता बीसीसीआय उर्वरित सामने इतरत्र आयोजित करण्यासाठी विंडो शोधत करत आहे. यासंदर्भात काय निर्णय घेतला जाईल हे पाहावे लागेल. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. मागील हंगामात हैदराबाद संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad owners donate 30 crore rupees for covid 19 relief work adn
First published on: 10-05-2021 at 19:44 IST