व्यक्ती सामान्य असो किंवा एखादा सेलिब्रिटी, तो जेव्हा जावई बनतो तेव्हा त्याचा थाटच निराळा असतो. सासुरवाडीमध्ये आपल्या प्रत्येक मागण्या मान्य करून घेणे, हा जणू जावयांचा जन्मसिद्ध हक्कच मानला जातो. भारताचा तारांकित क्रिकेटपटू सुर्यकुमार यादव देखील याला अपवाद नाही. मात्र, त्याच्या पत्नीने त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुर्यकुमार यादवने २ जुलै (शनिवार) रोजी संध्याकाळी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ‘सासुरवाडीहून परतल्यानंतर’ असे नाव देण्यात आलेले आहे. व्हिडीओमध्ये सुर्यकुमार आणि त्यांची पत्नी अक्षय कुमार व परेश रावल यांच्या संवादाची नक्कल करताना दिसत आहेत. देविशा म्हणते, “काय म्हणत होतास तू तिकडे, तुझं डोकं गरम झालं तर काय करणार?” हे ऐकून सुर्यकुमार जर गडबडून जातो आणि शांतपणे म्हणतो, “मी म्हणत होतो की एकदा माझं डोकं गरम झालं ना की ते लवकर थंडही होते.” दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सुमारे सात लाख वेळा तो पाहिला गेला आहे. तर, दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील सुर्यकुमारची फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सनेदेखील ‘व्वा, सूर्यादादा’, अशी कमेंट केली आहे. रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायणन हिनेही सुर्या आणि देविशाचा व्हिडीओवर खूप एन्जॉय केला.

हेही वाचा – Jasprit Bumrah World Record : भाजपाचे चंद्रकांत पाटीलही झाले बुमराहचे फॅन! केले खास ट्वीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुर्यकुमार यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा मजेदार व्हिडीओ शेअर करतो. मागच्या वर्षी क्वारंटाईन दरम्यान त्याने पृथ्वी शॉसोबत बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सुर्यकुमार यादव सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचा भाग आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ७ जुलैपासून इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नीही इंग्लंडमध्ये आहे.