भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषक २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा २१ ऑगस्टला केली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिल्लीत टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या १७ सदस्यीय टीममध्ये केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. या संघात आयसीसी टी-२० च्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमारलाही जागा मिळाली आहे. अशातच सूर्यकुमार यादवचं विश्वचषक खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. परंतु, सूर्यकुमार टी-२० मध्ये नंबर वन असला, तरीही त्याला वनडे क्रिकेटमध्ये धावांचा सूर गवसलेला नाहीय.

सूर्यकुमारची वनडे क्रिकेटमधील एकूण कामगिरीही चांगली नाहीय. त्याने आतापर्यंत २६ सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षीचा सूर्यकुमारची कामगिरी पाहिली तर, १० वनडे सामन्यात त्याची सरासरी खूप खराब आहे. तसंच यावर्षी सूर्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा डक आऊट होण्याचा लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी असतानाही सूर्यकुमारला संघात जागा मिळाली आहे.

नक्की वाचा – Asia Cup 2023: ‘या’ खेळाडूला वगळून करून मुख्य संघात संजू सॅमसनची निवड झाली असती…आकाश चोप्राचं मोठं विधान

सूर्यकुमारने वनडेत केला लाजिरवाणा विक्रम

वनडे क्रिकेटमध्ये यंदांचा हंमाग सूर्यकुमारसाठी खूप खराब गेला. यावर्षी सूर्यकुमारने एकूण १० वनडे क्रिकेटचे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये सूर्यकुमारे १४.११ च्या खराब सरासरीनुसार फक्त १२७ धावा केल्या आहेत. याचदरम्यान सूर्यकुमार यादव सलग तीन वनडे सामन्यांमध्ये गोल्डन डकचा शिकार झाला. त्यामुळे वनडे क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर नोंदवला गेला. सूर्यकुमार जगातील एकमेव खेळाडू आहे, जो तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. सूर्यकुमारे भारतीय मैदानांवरच हा लाजिरवाणा विक्रम केला आहे. यावर्षी मार्च महिन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्यांची मालिका खेळली. याच मालिकेत सूर्यकुमारने गोल्डन डकचा लाजिरवाणा विक्रम केला.

‘हे’ आहेत सलग तीन वनडे सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर  (1994)
अनिल कुंबळे (1996)
जहीर खान  (2003-04)
इशांत शर्मा (2010-11)
जसप्रीत बुमराह  (2017-2019)
सूर्यकुमार यादव  (2023)