Suryakumar Yadav Speech in dressing room video : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आणखी एक टी-२० मालिका खिशात घातली आहे. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत करणे सोपे काम नाही, पण युवा भारतीय संघाने ते करून दाखवले आहे. संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियात असताना सूर्यकुमारने युवा संघासह मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयात तिलक वर्मासारख्या युवा फलंदाजाने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने सलग दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावत भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. यानंतर बीसीसीआयने भारतीय ड्रेसिंग रुममधील सूर्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात संजू सॅमसननेही शतक झळकावले. वरुण चक्रवर्तीने शानदार पुनरागमन करत दमदार गोलंदाजी केली. एकूणच या युवा संघाने उज्ज्वल भविष्याचा संदेश दिला आहे. मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमारने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या खेळाडूंवर खूप प्रेमाचा वर्षाव केला, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्या म्हणाला, ‘प्रत्येकाला माहित आहे की मालिका जिंकणे किती आव्हानात्मक आहे? मागच्या वेळी आम्ही इथे आलो होतो, तेव्हा मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली होती. या मालिकेत २-१ अशी आघाडी झाल्यानंतरही आम्ही कसे खेळायचे हे ठरवले आणि मला वाटते की प्रत्येकाने पुढे ये आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली. ही मालिका आपण एक संघ म्हणून जिंकली असून याचे श्रेय सर्व खेळाडूंना जाते.’

हेही वाचा – Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार

U

सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूंचे मानले आभार –

सूर्यकुमारने सर्वप्रथम आपल्या संघातील सर्व खेळाडूंचे मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आणि नंतर काही खास खेळाडूंची नाव घेऊन विशेष आभार मानले. या मालिकेत एकही सामना खेळू न शकलेल्या विजयकुमार वैशाख, जितेश शर्मा आणि यश दयाल यांचे त्यांनी विशेष आभार मानले. एकही सामना खेळला नसतानाही संघाला प्रत्येक प्रकारे साथ दिल्याबद्दल त्याने या खेळाडूंचे आभार मानले आणि त्यानंतर संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्यासाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

हेही वाचा – Suryakumar Yadav : टीम इंडिया विकेटच्या सेलिब्रेशनमध्ये दंग असताना, कर्णधार सूर्याने आपल्या ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सपोर्ट स्टाफचे देखील केले खूप कौतुक –

सूर्यकुमारने संघाच्या सपोर्ट स्टाफचे खूप कौतुक केले. कारण त्याला वाटते की सपोर्ट स्टाफमुळेच आपला संघ इतका चांगला खेळ दाखवू शकला. सूर्यकुमारने सांगितले की, डर्बनला पोहोचताच त्याने मालिकेत संघ कसा खेळवायचा हे ठरवले होते आणि ती योजना यशस्वी करण्यात सपोर्ट स्टाफचे योगदान अतुलनीय होते. या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारत होते. त्यांच्यासोबत साईराज बहुतुले, हृषीकेश कानिटकर हेही उपस्थित होते. या भाषणादरम्यान त्याने सर्व खेळाडूंना एक सूचनाही केली. हा या वर्षातील शेवटचा टी-२० सामना होता. अशा परिस्थितीत त्याने सर्व युवा खेळाडूंना माायदेशता माघारी जाऊन देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, मी पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणार आहे.