Suryakumar Yadav on Champions Trophy India Squad Snub: सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. टी-२० क्रिकेटमधील सूर्यकुमार यादवचा रेकॉर्डही कमाल आहे. यामुळेच सूर्याला भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघाचं नेतृत्त्व करताना सूर्या आपली योग्य भूमिका बजावत आहे. सूर्या मधल्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाज असताना त्याला १९ फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही. याबाबत सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं आहे.

सूर्यकुमार यादवची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड केली नाही, यावरून अनेक दिग्गजांनी वक्तव्य केले. सूर्यकुमार यादव संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकला असता असं सुरेश रैना म्हणाला. पण सूर्यकुमार यादवची वनडे क्रिकेटमधील कामगिरी फारशी चांगली नव्हती. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी निराशाजनक आहे आणि त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली नाही.

Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ranji Trophy Quarterfinal Mumbai Squad Announced Suryakumar Yadav Shivam Dube to play vs Haryana
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईच्या संघात मोठे बदल, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना दिली संधी; कसा आहे संघ?
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे
If someone has quality he should be given more chances Shardul Thakur says selection committee after ranji trophy match
Ranji Trophy : “कोणाकडे गुणवत्ता असेल तर त्याला अधिक…”, टीम इंडियातून दुर्लक्ष केल्याने शार्दुल ठाकूरची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Jadeja take five wicket haul for Saurashtra against Delhi in Ranji Trophy 2024-25
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत रवींद्र जडेजाची कमाल! सौराष्ट्रासाठी पाच विकेट्स घेत दिल्लीच्या डावाला पाडली खिंडार
Who is Umar Nazir He Makes Rohit to Struggle for Every Single Run in Mumbai vs Jammu Kashmir
Ranji Trophy: रोहित शर्माला एकेका धावेसाठी झगडायला लावणारा उमर नझीर आहे तरी कोण? ‘पुलवामा एक्सप्रेस’ने मुंबई संघाची उडवली दाणादाण

खुद्द सूर्यकुमार यादवने वनडेमध्ये त्याची कामगिरी चांगली नसल्याचे मान्य केले. त्याने कामगिरी चांगली केली असती तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळाले असते, असेही तो म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग नसल्याबद्दल सूर्यकुमार दु:खी नाही, पण एका गोष्टीबाबत त्याची मनातील वेदना स्पष्टपणे समोर आली.

इंग्लंडविरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यादरम्यान त्याला प्रश्न विचारण्यात आला की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी संघात नसल्याबद्दल तू दु:खी आहेस का?’ यावर सूर्या म्हणाला, “मी दु:खी का असेन? जर मी चांगली कामगिरी केली असती तर चॅम्पियन्स ट्रॉफी संघात असतो. जर मी चांगली कामगिरी केली नाही तर ती गोष्ट स्वीकारणं महत्त्वाचं आहे.” तो पुढे म्हणाला, “आपण जर चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ पाहिला तर ते सर्वच खेळाडू खूप योग्य दिसत आहे. त्यात असलेले सर्व खेळाडू एकदिवसीय सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करणारे आहेत.”

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याचे सूर्या दु:खी नसून तो एकदिवसीय फॉरमॅटमध्ये चांगला खेळू शकला नाही याची त्याला खंत आहे. सूर्यकुमार पुढे म्हणाला, “मी चांगली कामगिरी केली नाही, हे विचार करून वाईट वाटतंय आणि जर मी चांगलं प्रदर्शन करत आलो असतो तर मी संघात असतो. पण जर मी चांगली कामगिरी केली नाही, तर खरोखर चांगली कामगिरी करू शकणारा कोणीतरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड होण्यास पात्र आहे.”

सूर्यकुमार हा टी-२० इंटरनॅशनलमधील विस्फोटक फलंदाज आहे. त्याने ४ शतकांच्या मदतीने २५०० हून अधिक धावा केल्या आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांमध्ये एकही शतक केलंल नाही. त्याने ३५ डावात ४ अर्धशतकांच्या मदतीने ७३६ धावा केल्या आहेत.

Story img Loader