टी२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ बुधवारी (९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर आमनेसामने येतील. किवी संघाने चालू स्पर्धेत आतापर्यंत शानदार खेळ दाखवला आहे. सुपर-१२ सामन्यांमध्ये किवी संघाने अनेक मोठ्या संघांना पराभूत करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. न्यूझीलंडने त्यांच्या शेवटच्या सुपर-१२ सामन्यात आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे वाया गेले आहेत. अशा स्थितीत यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, या सामन्यातही पाऊस ‘खलनायक’ ठरणार का?

टी२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात पाकिस्तानला पावसाची धास्ती वाटत आहे. सामना पूर्ण व्हावा हीच बाबर सेनेची इच्छा आहे. तसे जर झाले नाही तर न्यूझीलंड एकही चेंडू न खेळता अंतिम फेरीत जाईल. कारण जो संघ साखळी सामन्यात ग्रुप मध्ये अव्वलस्थानी असतो तोच थेट पुढच्या फेरीत जातो. या समीकरणानुसार न्यूझीलंड ग्रुप १ मध्ये अव्वल होता आणि पाकिस्तान ग्रुप २ मध्ये दुसऱ्या स्थानी आहे म्हणून न्यूझीलंड अंतिम फेरीत थेट पोहचू शकतो. यामुळेच पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते यांना हा सामना पूर्ण व्हावा आणि पावसाचा व्यत्यय येऊ नये अशी प्रार्थना ते करत आहेत.

हवामान आणि खेळपट्टी अंदाज

या विश्वचषकात आतापर्यंत एससीजीमध्ये खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. पण नाणेफेकीचा प्रभाव कमी करू शकणारा एक घटक आहे: उपांत्य फेरीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीच आहे ज्यावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-१२चा पहिला सामना खेळला गेला. सिडनीमध्ये आतापर्यंत वापरल्या गेलेल्या तीन खेळपट्ट्यांपैकी ही सर्वात सपाट आणि फलंदाजीसाठी अनुकूल आहे. बुधवारी सकाळी पावसाची शक्यता कमी आहे, परंतु सामना सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हवामान साफ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :   T20 WC 2022 NZ vs PAK: पाकिस्तान-न्यूझीलंडपैकी कोण मिळवणार फायनलचे तिकीट, जाणून घ्या

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.