भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहुल चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंडनं दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना केएल राहुल आणि इशान किशननं चांगली सुरुवात करून दिली. टी २० विश्वचषकापूर्वीच्या इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात केएल राहुलची बॅट तळपली. केएल राहुलने २४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. केएल राहुलने २१२ च्या स्ट्राइक रेटने ५१ धावा केला. त्यामुळे आगामी सामन्यात केएल राहुलकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

रोहित शर्मासोबत सलामीला केएल राहुल येणार आहे. केएल राहुल चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषविताना त्याने आक्रमक खेळी केली होती. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी तो ऑरेंज कॅपचा मानकरी होता. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १३ सामन्यात त्याने ६२६ धावा केल्या आहेत. यात नाबाद ९८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. राहुलने एकूण ४८ चौकार आणि ३० षटकार मारले आहेत.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल</p>