टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत नामिबियाने नेदरलँडचा ६ गडी राखून पराभव केला. नेदरलँडने ४ गडी गमवून विजयासाठी १६५ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान नामिबियाने ४ गडी गमवत १९ व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह नामिबियाने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.तर नेदरलँडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
नामिबियाचा डाव
स्टिफन बार्ड आणि झेन ग्रीननं संघाला सावध सुरुवात करून दिली. मात्र पीटर सिलारच्या गोलंदाजीवर नामिबियाला पहिला धक्का बसला. स्टीफन बार्ड १९ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ग्रीन फ्रेडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर मैदानात आलेला क्रेग विलियम्स जास्त काळ तग धरू शकला नाही. तो १३ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर गेरहार्ड आणि डेविड वीसची जोडी जमली आणि मोठी धावसंख्या उभारली. डेविसने ४० चेंडूत ६६ धावांची खेळी केली.
नेदरलँडचा डाव
सलामीला आलेल्या मॅक्स ओडाउड आणि स्टीफन मायबर्ग या जोडीनं नेदरलँडला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी ४२ धावांची भागीदारी केली. स्टीफन मायबर्ग फ्रायलिंकच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्टीफन १७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मर्वेही मैदानात जास्त काळ तग धरू शकला नाही. अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मॅक्स आणि कोलीनची जोडी जमली. मॅक्सने आपलं अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येत भर घातली. कोलीन ३५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मॅक्सही धावचीत झाला. त्याने ५६ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि षटकाराचा समावेश आहे.
नेदरलँडचा संघ- मॅक्स ऑडॉउड, स्टीफन मायबर्ग, रोइलॉफ मर्वे, कोलीन एकरमॅन, स्कॉट एडवर्ड्स, लोगन बीक, बास दी लीद, रॅन डोशेट, पीटर सीलार, फ्रेड क्लासेन, टीम वॅन
नामिबियाचा संघ- स्टीफन बार्ड, झेन ग्रीन, क्रेग विलियम्स, गेहार्ड इरास्मुस, डेविज वीस, जे स्मिथ, मायकल वॅन लिंगेन, जॅन फ्रायलिंक, निकोल लॉफ्ती, रुबेन ट्रम्पलमॅन, बर्नार्ड स्कोल्ट्ज