T20 WC: शोएब मलिकची स्पर्धेतलं वेगवान अर्धशतकं; सानिया मिर्झाने…

टी २० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब मलिकची बॅट चांगलीच तळपली.

Shoaib_Malik
T20 WC: शोएब मलिकची स्पर्धेतलं वेगवान अर्धशतकं; सानिया मिर्झाने…(Photo- Twitter)

टी २० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब मलिकची बॅट चांगलीच तळपली. शोएब मलिकने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या वेगवान अर्धशतकामुळे संघाला मोठी धावसंख्या उभरण्यास मदत झाली. स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने १८ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तर शोएब मलिकने १८ चेंडूत ५४ धावा केल्या आहेत.

सलामीला आलेल्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोहम्मद रिझवान हमजा ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १९ चेंडूत १५ धावा केल्या. या खेळीत एका षटकाराचा समावेश आहे. फखर झमानच्या रुपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. ख्रिस ग्रीव्ह्सच्या गोलंदाजीवर मायकल लीक्सने त्याचा झेल घेतला. मोहम्मद हफीज १९ चेंडूत ३१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारत आक्रमक फलंदाजी केली. मात्र सफयान शरिफच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाला साजेशी खेळी करून बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

शोएब मलिकने १८ चेंडूंचा सामना करताना ६ षटकार आणि १ चौकार मारला. शोएब मलिकचा स्ट्राइक रेट ३०० होता. ४० वर्षीय शोएब मलिकने टी २० वर्ल्डकपमध्ये पुनरागमन केलं आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील फॉर्म पाहता शोएबला संघात सहभागी केलं होतं. त्याच्या वादळी खेळीमुळे स्टँडमध्ये बसलेली पत्नी सानिया मिर्झा आनंदी झाली. तिने स्टँडमध्ये उभं टाळ्या वाजवून शोएबचं अभिनंदन केलं.

पाकिस्तानचा संघ- बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, असिफ अली, शादाब खान, इमाद वासिम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी

स्कॉटलंडचा संघ- जॉर्ज मुनसे, कायए कोएत्झर, डायलन बड्ज, रिची बेरिंगटोन, मायकल लीक्स, मॅथ्यू क्रॉस, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॅट, साफयान शरिफ, हमजा ताहिर, ब्रॅड व्हिल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc shoaib malik fastest half century rmt

Next Story
सर्वसामान्य चाहत्यांसाठी फक्त सहा हजार तिकिटे
ताज्या बातम्या