आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ चा पूर्वार्ध संपत आला आहे. यजमान ऑस्ट्रेलियासहित ग्रुप ए मधील न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत असून आज या चौघांपैकी दोन संघाचे भवितव्य ठरणार आहे. या विश्वचषकातील सुपर-१२ फेरी अत्यंत रोमांचक झाली आहे. यातील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत, परंतु अद्याप उपांत्य सामन्यात प्रवेश करणारे ४ संघ निश्चित झाले नाहीयेत. अशात दुसऱ्या ग्रुपमधून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांनी अंतिम चारकडे पाऊले टाकली आहेत. तसेच, पाकिस्तान आणि बांगलादेश संघांच्या आशा अजूनही कायम आहेत.

ग्रुप ए मधील संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघांचे ५-५ गुण आहेत. तसेच, श्रीलंकाही ४ गुणांवर आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीतील संधीबद्दल बोलायचं झालं, तर संघ तीन समीकरणातून जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांना श्रीलंका आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट आले आणि सामना रद्द झाला. तसेच, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध संघाला ८९ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे यजमान संघाचा नेट रनरेटही निगेटिव्हहून पॉझिटिव्ह झाला नाहीये. ऑस्ट्रेलियाचा सध्यच्या घडीला असलेला नेट रनरेट -०.३०४ आहे, त्यामुळे संघ गुणतालिकेत अजूनही तिसऱ्याच स्थानी आहे. मात्र, या तीन समीकरणे आहेत, ज्यांच्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ ग्रुप ए च्या अंतिम दोन मध्ये स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठू शकतो.

पहिल्या समीकरण ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करत ७ गुण मिळवावे लागतील. तसेच, श्रीलंका संघाने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याची आशा करावी लागेल. दुसऱ्या समीकरणानुसार न्यूझीलंडला आयर्लंडला हरवावे आणि तिकडे इंग्लंडने श्रीलंकेला जेणेकरून ऑस्ट्रेलियाचा रस्ता हा मोकळा होईल आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. तिसरे समीकरण जर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकला, तर अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तसेच, इंग्लंडपेक्षा चांगला नेट रनरेट करावा लागेल, ज्यामुळे दोन्ही संघ ७-७ गुणांवर असतील. तसेच, अंतिम निर्णय नेट रनरेटच्या आधारे ठरवला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड संघाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तर त्यांना श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. मग ते सहज उपांत्य फेरी गाठू शकतील. इतर कुठल्याही संघावर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच न्यूझीलंड संघांच्या बाबतीत देखील आहे. त्यांनी आयर्लंड संघाला हरवले तर त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के होईल. श्रीलंकेच्या बाबतील मात्र थोडे वेगळे आहे. कारण जर आयर्लंडने न्यूझीलंडला आणि तिकडे अफगणिस्तानाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर दोघांचे ५- ५ गुण असतील. मग श्रीलंकेने इंग्लंडला हरवले तर त्यांचे ६ गुण होतील. मग नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ उपांत्य फेरी गाठू शकतील.