T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० २०२४ च्या चषकातील सुपर ८ मधील आज शेवटचा सामना अफगाणिस्तान वि. बांगलादेश यांच्यादरम्यान सेंट विन्सेंट येथे खेळला जात आहे. याआधी भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारलेली असताना आजच्या सामन्यातील निकालानंतर चौथा संघ कोणता? याचे उत्तर मिळू शकेल. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र अफगाणिस्तानचा पराभव झाल्यास आणि नेट रन रेट कमी राहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित होऊ शकतात. आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र २० षटकात ५ गडी गमावून त्यांना केवळ ११५ धावा करता आल्या.

पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानंतर थोड्या उशिराने बांगलादेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊनही अफगाणिस्तानच्या सलामीवीरांना फारशी चमक दाखविता आली नाही. रहमनतुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झदरान यांनी संथ खेळी केल्यामुळे मध्य क्रमातील फलंदाजांवर ताण आला. कर्णधार रशीद खानने शेवटच्या क्षणी १० चेंडूत १९ धावा केल्या. ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. त्यामुळे अफगाणिस्तानला १०० चा आकडा पार करणे शक्य झाले.

IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर

ऑस्ट्रेलिया विरोधातील सामन्यात गुरबाज आणि झदरान यांनी तुफान फटकेबाजी करत अफगाणिस्तानसाठी भक्कम पाया उभारला गेला. मात्र आजच्या सामन्यात गुरबाजने ५५ चेंडूत केवळ ४३ धावा केल्या. तर इब्राहिम झदरानने २९ चेंडूत १८ धावा केल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या अझमतुल्ला १२ चेंडूत १०, गुलबदीन ३ चेंडूत ४, नबी ५ चेंडूत १ आणि करीम जनतने ६ चेंडूत ७ धावा केल्या. शेवटी आलेल्या कर्णधार रशीदने १० चेडूंत तीन षटकारांच्या मदतीने १९ धावा केल्या.

Ind vs Aus T20 World Cup: कांगारुंचं भवितव्य अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या हाती; काय आहेत समीकरणं?

बांगलादेशने १२.१ षटकाच्या आत ११६ या धावसंख्येचा पाठलाग केल्यास रनरेटमध्ये बांगलादेश अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढे जाऊ शकतो आणि उपांत्य फेरी गाठू शकतो.