टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३८ वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी अ‍ॅडलेड येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने मोठे वक्तव्य केले आहे. फिंच म्हणाला की त्याला शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची ७० टक्के शक्यता आहे, परंतु तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास संघाशी तडजोड करणार नाही. ऑस्ट्रेलियासाठी हा त्याचा शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे.

फिंच आणि टीम डेव्हिड या दोघांनाही हॅमस्ट्रिंगची दुखापत सारखीच आहे, जी आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयादरम्यान झाली होती. ऑस्ट्रेलियाला अॅडलेडमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विजय नोंदवावा लागेल आणि उपांत्य फेरीत जाण्यासाठी नेट रनरेटमध्ये मोठी वाढ करावी लागेल. त्याचबरोबर शनिवारी इंग्लंड-श्रीलंका सामन्याचा निकाल देखील त्यांचे भवितव्य ठरवू शकेल.

फिंचने बुधवारी थोडा धावला आणि तो खेळणार की, नाही हे ठरवण्यासाठी गुरुवारी प्रशिक्षणादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगची पुन्हा चाचणी करेल. फिंच गुरुवारी प्रशिक्षणापूर्वी म्हणाला, “मला खेळण्याची ७०-३० टक्के संधी आहे, परंतु पुढील सामन्यात मी संघाला अडथळा आणणार नाही याची खात्री करण्यासाठी मी आज दुपारी त्याची योग्य प्रकारे चाचणी घेईन. एका कमी खेळाडूसह खेळणे म्हणजे ही सर्वात वाईट परिस्थिती आहे.”

हेही वाचा – आभासी क्षेत्ररक्षणाचा कोहलीवर आरोप! ; पंचांनीही दुर्लक्ष केल्याचा बांगलादेशच्या नुरुल हसनचा दावा

फिंचने आधीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ही स्पर्धा त्याची शेवटची असू शकते, असे संकेत दिले आहेत. फिंच म्हणाला, “जर मला वाटत असेल की, माझ्यामुळे संघाच्या कामगिरीशी १ टक्‍क्‍यांमुळेही तडजोड होणार असेल, तर मी खेळणार नाही. जर मला माझ्या हॅमस्ट्रिंगमुळे चांगले वाटत नसेल, तर मी खेळणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.