टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी क्रिकेटरसिकांना अनपेक्षित घडामोडी पहायला मिळाल्या. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आणि सगलं चित्रच पालटलं. या सामन्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. या दोन सामन्यांमुळे टी-२० स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे गट २ मधून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत.

नेदरलँडच्या विजयामुळे तिसऱ्या क्रमांकावर असणारा पाकिस्तान संघ पुन्हा एकदा स्पर्धेत परतला आहे. नेदरलँड आणि दक्षिण अफ्रिकेतील सामना संपल्यानंतर अ‍ॅडलेडच्या त्याच मैदानात पाकिस्तान आणि बांगलादेशची लढत होणार होती. या विजयानंतर पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर फक्त शिक्कामोर्तबच होणार नव्हतं, तर नेदरलँड संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर येणार होता. त्यामुळे मैदानात बाबर आझम दिसताच नेदरलँडच्या खेळाडूने त्याला “तुम्ही जिंकाल याची खात्री करा, मग आम्ही चौथ्या स्थानावर राहू,” असं म्हटलं.

“Ouch!…,” नेदरलँड्सने केलेल्या पराभवानंतर ए बी डेव्हिलियर्सचं ट्वीट, म्हणाला “आमच्या खेळांडूसाठी वाईट…”

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “त्यांनी आम्हाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. आम्ही पुढील टी-२० वर्ल्डकपमधील त्यांचा प्रवेश निश्चित करु”, असं त्याने म्हटलं आहे.

ब्रेंडन ग्लोव्हरच्या (९ धावांत ३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर नेदरलँड्सने रविवारी ‘अव्वल १२’ फेरीतील निर्णायक सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर १३ धावांनी विजय मिळवत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली. या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

T20 World Cup: सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडण्याआधी रोहित शर्माचं विधान, म्हणाला “त्यांचं क्रिकेट फारच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या नेदरलँड्सने ४ बाद १५८ धावा केल्या. यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेला ८ बाद १४५ धावसंख्येवर रोखत जागतिक क्रिकेटमधील आपल्या सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली. क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात नेदरलँड्सचा दक्षिण अफ्रिकेवर हा पहिला विजय आहे.