Tamim withdraws retirement on PM Sheikh Hasina’s request: बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालने गुरुवारी (६ जुलै) एक धक्कादायक निर्णय घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता एका दिवसानंतर तमिमने यू-टर्न घेत निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर तमिम इक्बालने हा यू-टर्न घेतला.

तमिमने शुक्रवारी (७ जुलै) दुपारी शेख हसीना यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तमीमची पत्नी आयशा, माजी कर्णधार मशरफी मुर्तझा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसनही उपस्थित होते. नजमुल हसनने रात्री उशिरा पत्रकार परिषदेत बोलताना तमीम निवृत्तीतून पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली. नजमुल हसनसोबतच्या वादामुळे तमिमने निवृत्ती घेतल्याचे वृत्त होते.

lत्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी तमीम इक्बालची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर त्याला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली. शेख हसीना यांनी सांगितले की, विश्वचषकात बांगलादेशी संघ त्याच्याशिवाय कसा कमकुवत होईल. तमीम इक्बाल हे नम्र आवाहन फेटाळू शकला नाही. यानंतर बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशाच्या सर्वोच्च नागरिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल, असेही नमूद केले.

हेही वाचा – BAN vs AFG : बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मोठी घोषणा! तमिम इक्बालच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवली संघाची जबाबदारी

दुसरीकडे, बीसीबी प्रमुख हसन म्हणाले की, मला माहित आहे की एक उपाय जवळ आहे आणि तो तमिमसोबत बसू शकतो आणि त्याला आपला निर्णय मागे घेण्यास राजी करू शकतो. हसन म्हणाले, “मला त्याच्या पत्रकार परिषदेतून कळले की ते त्यांच्या निर्णयाबद्दल भावूक होता. मला माहित होते की जर आम्ही समोरासमोर बसून यावर तोडगा काठू शकतो. आम्ही पंतप्रधानांमार्फत त्याच्यासोबत बसलो आणि त्यांनी तुम्हाला सांगितले. निवृत्ती मागे घेण्याबरोबरच तो सहा आठवड्यांचा ब्रेक घेत आहे, या दरम्यान तो त्याच्या दुखापतीतून तसेच मानसिकदृष्ट्याही बरा होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमिम इक्बाल पत्रकार परिषदेत काय म्हणाला होता?

३४ वर्षीय तमीम म्हणाला होता, “माझ्यासाठी हा शेवट आहे. मी माझे सर्वोत्तम दिले आहे. याच क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी माझे सर्व सहकारी, सपोर्ट स्टाफ, बीसीबी अधिकारी, माझे कुटुंबीय आणि या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.”