काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम काढण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यावर टीका केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही या वर टीका केली आहे. पण त्याच्या या टीकेला उत्तर देत भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सणसणात शाब्दिक चपराक लगावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ पंतप्रधान इम्रान खान यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे. यास तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्या. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मी मजार-ए-कैद येथे उपस्थित राहणार आहे. आपल्या काश्मीरी बांधवांच्या समर्थनासाठी तुम्हीदेखील माझ्यासोबत या. ६ सप्टेंबर रोजी मी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि लवकरच LOC वरही भेट देणार आहे”, असे आफ्रिदीने ट्विट केले.

त्याच्या या ट्विटवर गौतम गंभीरने त्याला सणसणीत शाब्दिक चपराक लगावला. ”या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी स्वतः आफ्रिदीलाच विचारत आहे की आफ्रिदीने स्वत: आणखी ओशाळवाणे आणि निर्लज्ज होण्यासाठी पुढे काय करावे? ज्यामुळे हे सिद्ध होईल की आफ्रिदी अजूनही अपरिपक्वच आहे. मी आफ्रिदीसाठी शिशु वर्गातील विद्यार्थ्यांसाठीचे ट्युटोरियल ऑर्डर केले आहे”, अशा शब्दात गंभीरने त्याला उत्तर दिले.

गंभीरच्या उत्तरामुळे आफ्रिदी चांगलाच रागवला आणि त्याने त्यानंतर भारतीय प्रशिक्षक वर्गातील माजी फिजीओ यांचे वाक्य असलेला फोटो ट्विट केला.

दरम्यान, यावर गंभीरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सडेतोड दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india bjp mp gautam gambhir pakistan shahid afridi kashmir issue article 370 vjb
First published on: 29-08-2019 at 10:34 IST