भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून कर्णधार रोहित शर्माचे नशीब सतत चमकत आहे. आपल्या कर्णधारपदाखाली टी-२० मालिकेत क्लीन स्वीपची रोहितने हॅट्ट्रिक केली आहे. आता रोहितने नुकतीच एक नवीन कार घेतली आहे. त्याने खरेदी केलेल्या कारचे नाव लॅम्बोर्गिनी उरुस असून ती निळ्या रंगाची आहे. सोशल मीडियावर या कारची जोरदार चर्चा सुरू आहे.
भारतातील लक्झरी कारच्या यादीत ‘लॅम्बोर्गिनी उरुस कार’चे नाव अव्वल आहे आणि देशात फार कमी लोकांकडे ही कार आहे. त्यापैकी रणवीर सिंग, कार्तिक आर्यन आणि रोहित शेट्टी यांच्याकडे ही कार आहे.
हेही वाचा – मु्ंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूची कमाल; नेट्समध्ये बॅटिंग करत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत ३ ते ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. पुढील आणि मागील बंपरसह संपूर्ण कार निळ्या रंगात रंगवण्यात आली आहे. निळा हा रोहित शर्माचा आवडता रंग आहे, त्याच्याकडे आधीपासूनच निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू एम फाइव्ह (BMW M5) आहे.