IND vs UAE, Playing 11 Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ आमनेासामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानने ९४ धावांनी दमदार विजयाची नोंद केली. स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत भारतीय संघाचा सामना यूएईविरूद्ध होणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
जितेश शर्माला संधी मिळणार?
या सामन्यात शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो. गिल सलामीला येणार असल्याने संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. सॅमसनला जर संधी दिली जाणार नसेल, तर त्याच्या जागी जितेश शर्माला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते.
या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या खेळताना दिसू शकतो. तर सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. फिरकी गोलंदाज म्हणून मिस्ट्री गोलंदाज वरूण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.
संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पण, जर गिल सलामीला येणार असेल आणि जितेश शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करणार असेल, तर संजू सॅमसनला विश्रांती दिली जाऊ शकते. सहाय्यक प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने शिवम दुबे या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. यासह रिंकू सिंग आणि हर्षित राणाला देखील आपल्या संधीची वाट पाहावी लागेल.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रिंकू सिंह आणि कुलदीप यादव.