भारतीय संघाची आढावा बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, परंतु बीसीसीआयने केवळ दुखापती आणि वर्कलोड व्यवस्थापनासाठी आपली योजना अधिकृतपणे उघड केली आहे. यो-यो टेस्ट व्यतिरिक्त बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये परतण्यासाठी डेक्सा टेस्ट अनिवार्य केली आहे. शिवाय, युवा खेळाडूंना भारताच्या निवडीसाठी पात्र होण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील.

बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी मुंबईत टीम इंडियाची (वरिष्ठ पुरुष) आढावा बैठक घेतली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, मानद सचिव जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. त्याचबरोबर वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष श्री चेतन शर्मा सहभागी झाले होते.”

मुंबईतील टीम इंडियाच्या आढावा बैठकीनंतर, बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, ”बीसीसीआयने २० खेळाडूंची निवड केली आहे. ज्यांना ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत रोटेट केले जाईल.” आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी रोडमॅप तसेच खेळाडूंची उपलब्धता, कामाचा ताण व्यवस्थापन आणि फिटनेस पॅरामीटर्स या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य शिफारसी –

१.उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील.

२. यो-यो चाचणी आणि डेक्सा आता निवड निकषांचा भाग असतील आणि खेळाडूंच्या केंद्रीय पूलसाठी सानुकूलित रोडमॅपमध्ये लागू केले जातील.

३.बीसीसीआयने २० खेळाडूंची निवड केली आहे. ज्यांना एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोटेट केले जाईल.

हेही वाचा – ICC Test Ranking: इंग्रजांनी संपवले सहा वर्षांतील भारताचे वर्चस्व; विराटच्या राज्यात कमावलेलं रोहितच्या संघानं गमावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४.पुरुषांच्या एफटीपी आणि आयसीसी सीडब्ल्यूसी २०२३ ची तयारी लक्षात घेऊन, एनसीए आयपीएल फ्रँचायझींच्या सहकार्याने आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होणाऱ्या लक्ष्यित भारतीय खेळाडूंवर लक्ष ठेवेल.