* नेटिझन्समध्ये ‘सबिना’च्याच नावाची चलती
‘सबिना अल्त्यानबेकोवा’ ही कझाकस्तानच्या युवा व्हॉलीबॉल संघातील व्हॉलीबॉलपटू. सबिना सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरली आहे ते आपल्या खेळामुळे नाही, तर तिच्या सौंदर्यावरून!
होय, कझाकस्तानच्या या १७ वर्षीय युवा खेळाडूने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटिझन्समध्ये सध्या सबिनाच्याच नावाची चलती पहायला मिळत आहे. इतकेच काय, तर तेथील स्थानिक माध्यमांनी सबिनाला खेळताना पाहून व्हॉलीबॉल खेळाला ‘सुंदर’तेचे रुप प्राप्त झाल्याचे म्हटले. या संघाच्या कोणत्याही सामन्यादरम्यान, केवळ सबिनाच्याच नावाचा जल्लोष प्रेक्षकांमध्ये सुरू असतो मात्र, आपल्या सुंदरतेने माझी ओळख निर्माण न होता माझ्या खेळाने मी चाहत्यांमध्ये ओळखली जावी असे प्रांजळ मत सबिना व्यक्त करते.
सबिना अल्त्यानबेकोवा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ती आशियाई १९ वर्षांखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत. परंतु, तिच्या खेळाऐवजी सुंदरतेचेच गुणगाण नेटिझन्समध्ये चर्चिले जाऊ लागले. त्यामुळे संघाचे प्रशिक्षकही त्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसतात. कारण, प्रत्येक सामन्यावेळी केवळ सबिनाच्याच नावाचा प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू असल्याने प्रत्यक्ष व्हॉलीबॉल खेळाकडे मात्र दुय्यमरित्या पाहिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सबिनाच्या फेसबुक अकाऊंटवर सध्या एक लाख चाळीस हजारांहून अधिक चाहते आहेत तर, युट्युबवर देखील संघाच्या इतर कौशल्यवान खेळाडूंपेक्षा सबिनाच्याच व्हिडिओ पाहिल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teenage volleyball player from kazakhstan branded too beautiful to play the game becomes an internet sensation
First published on: 01-08-2014 at 04:15 IST