लिएंडर पेसचं राजकारणात पदार्पण ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

टीएमसी प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश सोहळा

प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची निवड केली आहे. गोव्यामध्ये आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.

“ आपणास सांगण्यास आनंद होत आहे की लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंद आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते.” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.

ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर…; म्हणाल्या, “पश्चिम बंगाल आणि गोव्याला फुटबॉल…”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tennis champion leander paes joins tmc in goa msr

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या