थायंलड बॉक्सिंग स्पर्धा

भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू भाग्यवती कचारीने मंगळवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारून किमान कांस्यपदक निश्चित केले. त्याशिवाय पुरुषांमध्ये आशीष कुमार आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भाग्यवतीने ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात व्हिएतनामच्या नगुएन हॉगला ५-० अशी धूळ चारली.

पुरुषांमध्ये आशीषने ६९ किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व लढतीत क्रोएशियाच्या पीटर सेटिनिचला ५-० असे नामोहरम केले. मोहम्मदने ५६ किलो गटात  जॉर्ज मोलवांताला ५-० असे पराभूत केले. याव्यतिरिक्त मनीषा मौन (५७), मंजू राणी (४८), ब्रिजेश यादव (८१) यांनीसुद्धा उपांत्यपूर्व फेरी गाठली.