थायलंडच्या पुरुष व महिला कबड्डी संघांनी आपल्या कौशल्यपूर्ण व दमदार खेळाच्या जोरावर नाशिककरांची मने जिंकत आपल्या जिल्हा दौऱ्याचा सोमवारी दिमाखात समारोप केला. थायलंडच्या महिलांनी या दौऱ्यात सर्व सामने जिंकले.
जिल्हा कबड्डी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त येथील क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने थायलंड कबड्डी संघाच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात थायलंड संघाविरुद्धचे सामने झाले. शेवटच्या दिवशी थायलंडच्या महिलांनी महेशदादा संघाचा ३०-२० असा १० गुणांनी पराभव करून या दौऱ्यात अजिंक्य राहण्याचा मान मिळविला. थायलंडकडून कुकी, मिऊ यांनी तर महेशदादा संघाकडून पूजा शेलार, कोमल गायकवाड, छाया पंडित यांनी उत्कृष्ट खेळ केला. थायलंडच्या पुरुषांनी नंदुरबारचा ३५-३० असा पाच गुणांनी पराभव केला. थायलंडच्या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ. उत्तमराव ढिकले, काशिनाथदादा टर्ले, डॉ. मंगेश चव्हाण, दामोदर मानकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
नाशिक जिल्हा दौऱ्यात थायलंडचा महिला कबड्डी संघ अजिंक्य
थायलंडच्या पुरुष व महिला कबड्डी संघांनी आपल्या कौशल्यपूर्ण व दमदार खेळाच्या जोरावर नाशिककरांची मने जिंकत आपल्या जिल्हा दौऱ्याचा सोमवारी दिमाखात समारोप केला.

First published on: 05-08-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thailand women kabaddi team win match in nashik tour