आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा प्रमुख खेळाडू महेंद्रसिंह धोनीही आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीचा आयपीएलची नवी जाहीरात पाहतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ मार्चपासून धोनी सरावासाठी मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. एकीकडे धोनी निवृत्ती कधी स्विकारणार या चर्चांना उधाण आलेलं असतानाही त्याला आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळावी अशी चाहत्यांची मागणी आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी धोनीचं भारतीय संघातलं पुनरागमन हे आयपीएल हंगामावर अवलंबून असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आगामी काळात धोनी आयपीएलमध्ये कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.