scorecardresearch

Asia Cup 2023: टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही; मार्चमध्ये स्थळ ठरणार, यजमानपदाच्या शर्यतीत यूएई आघाडीवर

ACC Meeting: शनिवारी जय शाह, नजम सेठी आणि इतर सदस्य राष्टांमध्ये एसीसीची बैठक पार पडली. या बैठकीत आशिया चषक २०२३चे आयोजन कुठे करायचे? यावर मार्चमध्ये निर्णय घेण्याचे ठरले आहे.

ACC Meeting Decision Jay Shah vs Najam Sethi
जय शाह (फोटो-संग्रहित इंडियन एक्सप्रेस)

शनिवारी बहरीनमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठक पार पडली. या पहिल्या औपचारिक बैठकीनंतर एक निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय घेईल, असे ठरले आहे.

आशिया कपच्या यजमानपदाचे अधिकार सुरुवातीला पाकिस्तानला देण्यात आले. त्याचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये होणार होते, परंतु एसीसीसीचे प्रमुख शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले की, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईची तीन ठिकाणे – दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे या स्पर्धेचे यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

एसीसीद्वारे खंडीय संस्थेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पीसीबी चेअरमन सेठी यांच्या आदेशानुसार बोलावण्यात आली होती. या बैठकीला एसीसी सदस्य राष्ट्रांचे सर्व प्रमुख उपस्थित होते, ज्यामध्ये पाकिस्तानचे यजमान म्हणून नाव दिले नाही.

हेही वाचा – Court on Ayesha Mukherjee: शिखर धवनची पत्नी आयेशाला कोर्टाने सुनावलं; धवनच्याविरुद्धात ‘या’ गोष्टी करण्यास केली मनाई

याबाबत माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एसीसी सदस्यांची आज बैठक झाली आणि खूप सकारात्मक चर्चा झाली. मात्र स्थळ स्थलांतराचा निर्णय मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पण खात्री बाळगा की भारत पाकिस्तानात जाणार नाही, स्पर्धाच दुसरीकडे हलवली जाईल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या खेळाडूंशिवाय प्रायोजक स्पर्धेतून माघार घेतील.”

हेही वाचा – IND vs AUS: नाद करा पण धोनीचा कुठं…! बॉर्डर गावसकर मालिकेतही भल्या-भल्यांना टाकलंय मागं, पाहा विक्रम

एसीसीच्या एका आतील व्यक्तीने सांगितले की सेठी अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष बनले आहेत. जर त्यांनी पहिल्याच बैठकीत माघार घेतली, तर त्याचा त्यांच्या देशात वाईट परिणाम होईल. पाकिस्तान सध्या आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करत आहे. आशिया चषक सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे पीसीबीसाठी तोट्याचा करार ठरेल, जरी एसीसीने त्यांना अनुदाने दिले तरीही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 10:15 IST